मुंबई

पाच हजार कोटींचा मालक एका दिवसासाठी झाला भिकारी

CD

पाच हजार कोटींचा मालक
एका दिवसासाठी झाला भिकारी
पराग शाह यांनी घेतला अनुभव
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : सुमारे पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती, आलिशान जीवनशैली, सुरक्षा रक्षकांचा ताफा, महागड्या गाड्या आणि आमदारपद... असे वैभवशाली जीवन जगणारे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी एका दिवसासाठी चक्क भिकाऱ्याचे जीवन जगण्याचा अनुभव घेतला. भिकाऱ्याचा वेश धारण करत ते घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरले. विशेष म्हणजे या काळात त्यांना एकाही व्यक्तीने ओळखले नाही.
जैन धर्माच्या चातुर्मासादरम्यान नम्रमुनीजी महाराज यांनी आमदार शाह यांना गरजू आणि वंचित घटकांचे जीवन प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी काही काळ सामान्य भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगण्याची सूचना केली. त्यानुसार शाह यांनी भिकाऱ्याचा वेश धारण केल्यानंतर ते घाटकोपरमधील विविध भागांत फिरले. त्यांनी नागरिकांकडे भीक मागितली. मिळालेल्या पैशांतून अन्न घेतले आणि दिवसभर भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव घेतला. याचबरोबर त्यांनी रस्ते व फुटपाथवर झाडू मारून स्वच्छताही केली.
---
माणसाची ओळख ही त्याच्या पदाने, पैशाने असते. हे मला शिकायला मिळाले. वेश बदलल्यावर माझ्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनीही मला बाहेर काढले. दोन वेळ अन्नदेखील मिळत नाही, त्यांच्यासाठी माझे कार्य पुढे अविरत राहील.
- पराग शाह, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT