नवी मुंबईत जाहिरातीसाठी झाडांचा बळी!
तुर्भे, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी यांसह विविध परिसरांमध्ये गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाडांना खिळे ठोकून, तारा बांधून आणि फांद्या मोडून अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. यामुळे झाडांना मोठी हानी पोहोचत असून, महापालिकेचा उद्यान विभाग आणि अनधिकृत बांधकाम विरोधी (अतिक्रमण) विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
झाडांना खिळे ठोकून जाहिरात करणे किंवा विद्युत रोषणाई करणे हे पर्यावरण अधिनियमानुसार बेकायदेशीर आहे. यासंदर्भात नवी मुंबई पालिकेच्या उद्यान विभागामार्फत जाहीर आवाहनही वारंवार प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये संबंधितांवर पर्यावरण अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे, परंतु अनेकांनी पालिकेच्या या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. गणेशोत्सवाच्या आडून सीबीडी, नेरूळ, सीवूड रेल्वे स्थानक, सारसोळे कुकशेत मैदान, सानपाडा पेट्रोलपंप, एपीएमसी यांसह तुर्भे, वाशी, कोपरखैरणे आदी परिसरात सर्रासपणे झाडांना खिळे ठोकून जाहिराती केल्याचे दिसून येत आहे, मात्र उद्यान सहाय्यक यांच्याकडून केवळ नोटिसा बजावल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.