मुंबई

‘राख व्हायच्या आधी...’ला पहिला मान

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रीय भावनेला चालना देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या श्री गणेश दर्शन स्पर्धेच्या ३८व्या वर्षी महागिरी येथील एकविरा मित्र मंडळाने बाजी मारली. मंडळाने साकारलेल्या ‘राख व्हायच्या आधी थोडं जगून घ्या’ या सामाजिक आशयाच्या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला. मंडळाला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. गणेशोत्सव मंडळांच्या कलात्मकतेला व्यासपीठ मिळावे, देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेतील पारितोषिकांचा निर्णय घेताना गणेशमूर्तीची सुबकता व मांगल्य, सजावटीतील वैविध्य, नेत्रदीपकता, देखाव्याचा आशय, सामाजिक बांधिलकी तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी संबंधित विषयांचा विचार करण्यात आला. यंदा शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि स्थानिक मूर्तिकारांना विशेष प्राधान्य देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ११ लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. दीर्घकाळ सातत्याने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
…………..
मुख्य स्पर्धेचा निकाल
प्रथम : एकविरा मित्र मंडळ, महागिरी - ‘राख व्हायच्या आधी थोडं जगून घ्या’ (१ लाख रुपये)
द्वितीय : डवले नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य नगर - ‘निसर्ग प्रकोप’ (७५ हजार रुपये)
तृतीय : शिवाई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - ‘पॉक्सो-दळ बालपणाचा’ (५० हजार रुपये)
चतुर्थ : शिवसम्राट मित्र मंडळ, कुष्ठरोग वसाहत - ‘तरुण भारत, नवशक्तीचा, नवचैतन्याचा भारत’ (२५ हजार रुपये)
…………
विविध विभागांतही गौरव
सर्वोत्कृष्ट सजावट : शिवसाई मित्र मंडळ, केणी नगर, वागळे इस्टेट (२५ हजार रुपये)
उत्कृष्ट श्रीमूर्ती : ठाण्याचा गणाधीश, श्री शंभुराज मित्र मंडळ, वसंत विहार; गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा; जय भवानी सार्वजनिक मंडळ, महाराष्ट्र नगर, वागळे इस्टेट - प्रत्येकी १० हजार रुपये
आदर्श गणेशोत्सव मंडळ : प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे - १० हजार रुपये
उत्कृष्ट संहितालेखन : प्रशांत डोर्लेकर, गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा - १० हजार रुपये
याशिवाय विविध मंडळांना विशेष रोख पारितोषिके आणि गुणवत्ता पारितोषिके देण्यात आली आहेत. विशेष रोख पारितोषिकासाठी १७, तर गुणवत्ता पारितोषिकासाठी १६ मंडळांची निवड करण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषिकही जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT