संत रोहिदास मार्गावरील चिखल हटविला
धोकादायक बनलेल्या मार्गाची पालिकेकडून स्वच्छता
धारावी, ता. २० (बातमीदार) : संत रोहिदास मार्गावर डम्परमधून माती आणि चिखल पडून रस्ता निसरडा झाल्याने निर्माण झालेल्या धोक्याची दखल पालिकेने घेतली आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये ११ सप्टेंबर रोजी ‘संत रोहिदास मार्ग अतिधोकादायक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पालिकेने रस्ता साफ करून घेतला असून, डम्परमधून माती व चिखल रस्त्यावर पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. रस्त्याच्या नियमित सफाईकडेही लक्ष दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
काळा किल्ला परिसरातील पालिकेच्या उदंचन केंद्राचे तसेच सायन स्थानकासमोरील वाहतूक पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी मातीची वाहतूक करणाऱ्या डम्परमधून रस्त्यावर माती आणि चिखल पडत होता. त्यामुळे संत रोहिदास मार्ग निसरडा झाला होता. पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला होता. दुचाकी घसरून काही जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने रस्ता स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच माती आणि चिखलाची वाहतूक करणाऱ्या डम्परमधून रस्त्यावर काही पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या मार्गावरील त्रास कमी झाला आहे. आता रस्त्यावर चिखल साचत नसल्याने वाहनचालकांचा त्रास कमी झाला आहे, अशी माहिती स्थानिक दुकानदार लक्ष्मीकांत कुरील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.