मुंबई

चालिहा साहेब मटकी मेळा उत्साहात

CD

उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : डोक्यावर पारंपरिक मटकी आणि मुखी ‘आयो लाल झूलेलाल’चा अखंड जयघोष करीत हजारो सिंधी बांधवांनी उल्हासनगरमध्ये श्रद्धेचा महासागर फुलविला. कॅम्प पाचमधील प्रसिद्ध पूज्य चालिहा साहेब मंदिराच्या मटकी मेळ्यात ६० हजारांहून अधिक भाविकांनी जलदेवतेचे पूजन केले. भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर झूलेलालमय झाला होता.
प्रसिद्ध पूज्य चालिहा साहेब मंदिरात सिंधी समाजाच्या ४० दिवसीय चालिहा साहेब व्रत महोत्सवानिमित्त पारंपरिक मटकी मेळा उत्साहात पार पडला. पूज्य साई वसंशाह दरबारचे गादीसर साई कालीराम, छोटे नवाब साई छोटूराम, संत-महात्मे, विश्वस्त आणि सेवाधाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान झूलेलाल साई व अखंड ज्योत साहेबांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर बहराणा साहेबांची रस्म पूर्ण करून संत-महात्म्यांनी डोक्यावर मटकी धारण करीत मेळ्याला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून हजारो महिलांनी ‘आयो लाल झूलेलाल’चा जयघोष करीत मटकी यात्रेत सहभाग घेतला. दुपारी तीन नंतर पुरुष भाविकांसाठी मटकी कार्यक्रम सुरू झाला. ६० हजारांहून अधिक भाविकांनी मटकीद्वारे जलदेवतेचे पूजन करून ती पवित्र जलात विसर्जित केली. परिमंडळ चार आणि ठाणे पोलिसांच्या बंदोबस्तासह विश्वस्त व सेवाधाऱ्यांनी गर्दीचे योग्य नियोजन केल्याने मटकी मेळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT