शहापूरकडे येणाऱ्या बसचा भीषण अपघात
१७ प्रवासी गंभीर; २० किरकोळ जखमी
शहापूर, ता. २१ (वार्ताहर) : बसचालकाचा ताबा सुटल्याने कोठारे गावाहून शहापूरकडे येणाऱ्या एसटी बसला सोमवारी (ता. २१) सकाळी ९च्या सुमारास भीषण अपघात झाला. ५० ते ६० प्रवाशांनी भरून वाहतूक करणाऱ्या या अपघातात १७ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये एका गर्भवती महिलेसह १२ महिलांचा समावेश आहे.
शहापूर बस आगारातील एसटी रात्री कोठारे गावात मुक्कामी होती. सकाळी शहापूरकडे येत असताना एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर कोठारे ते अवकळवाडी यादरम्यान तीव्र उतार व घाट रस्त्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला, त्यामुळे बस संरक्षक भिंतींवर धडकली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस उजव्या बाजूला वळविली, या अपघातात १७ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्यानेच अपघात झाल्याचे शहापूर आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी सांगितले.
-------
देऊ पोकळा, करुणा मधे, करण भुतांबरे, हिरा उर्फ वैशाली देसले, मंगळी वीर, धोंडू देसले, शिडू हंबीर, आशा देसले, कमल लखांबरे, भागी पादीर, ज्योती लखांबरे, सपना भगत, फसाबाई देसले, चंद्रकांत जाधव, वैशाली फसाळे, शांता फसाळे, कांचन हिंदोळे यांच्यावर शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.