मुंबई

गर्दीच्या बसमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : गर्दीच्या बसमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने अटक केली. अनिल जाधव (४७), सुरेश ऊर्फ सुरी दयानंद डी. आणि सागर सावर्डेकर (३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे २१.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे नौपाडा पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मनीषा कळंके या ११ सप्टेंबरला सकाळी बेस्ट बस क्रमांक ४९४ मधून मनीषानगर, कळवा ते हिरानंदानी सर्कल असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळासह बसच्या मार्गावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यातून संशयितांची ओळख पटवून त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सापळा रचून तिघांना १७ सप्टेंबरला अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करीत आहेत.

चौकशीत दुसरा गुन्हाही उघड
अटक केलेल्या तिघांची पोलिस कोठडीत चौकशी केली असता, त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक चोरी केल्याचे उघड झाले. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले तीन लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे २१.५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT