मुंबई

डायलिसिस केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात

CD

डायलिसिस केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पालिका क्षेत्रातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी खारघर आणि नवीन पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या मोफत डायलिसिस केंद्रांच्या कामाला गती देण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी सोमवारी (ता. २१) संबंधित अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
खारघर सेक्टर ३६ येथील प्लॉट क्रमांक १७ आणि नवीन पनवेल सेक्टर ६ येथील जी-१ येथे प्रत्येकी २५ खाटांची दोन अत्याधुनिक मोफत डायलिसिस केंद्रे उभारण्यात येत आहेत. महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू आहेत. या दोन्ही केंद्रांमध्ये अतिदक्षता विभागाच्या धर्तीवरील सुविधा आणि आधुनिक डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, कामोठे येथील मलनिस्सारण केंद्रांतर्गत उभारण्यात येत असलेल्या १५ दललि क्षमतेच्या पाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्राच्या कामाचीही अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. या पाहणीवेळी मुख्य अभियंता राजेश कर्डिले, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अभियंते प्रीतम पाटील, दिलीप बोकाडे, कनिष्ठ अभियंता महेश वाघमारे, विद्युत विभागाचे प्रमुख किरण जाधव यांच्यासह सल्लागार, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

६०० रुग्णांना तीन वेळा मोफत डायलिसिस सेवा
प्रत्येक केंद्रात तीन पाळ्यांमध्ये दररोज १०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे दोन्ही केंद्रांतून दररोज सुमारे २०० रुग्णांना डायलिसिस सेवा मिळू शकणार आहे. आठवड्यात सुमारे ६०० रुग्णांना तीन वेळा मोफत डायलिसिस सेवा देण्याची क्षमता निर्माण होणार असून, रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

तज्ज्ञ वैद्यकीय पथक
केंद्रांमध्ये तज्ज्ञ मूत्रपिंडरोगतज्ज्ञ, डायलिसिस डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि परिचारिका कार्यरत असणार आहेत. प्रत्येक २५ खाटांपैकी पाच खाटा संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी, दोन खाटा गरोदर महिला व बालकांसाठी आणि दोन खाटा पालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पनवेल क्षेत्रातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना वेळेत आणि मोफत डायलिसिस सेवा मिळणे हा या केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही डायलिसिस केंद्रांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच कामोठे येथील पाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्राचे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे
- गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT