खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी!
ट्रेलरच्या चाकाखाली आल्या; उपचारादरम्यान मृत्यू
बोईसर, ता. २२ (वार्ताहर) : बोईसर-चिल्हार मार्गावरील खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मंगला हिरा किणी (वय ५३, रा. बहाडोली) यांचा बेटगाव येथील स्मार्ट बाजारसमोर अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगला किणी पतीसोबत दुचाकीवरून बोईसरच्या दिशेने जात असताना बेटगाव येथील स्मार्ट बाजारासमोरील रस्त्यावर दुचाकी घसरली. या वेळी मंगला रस्त्यावर पडताच त्या बाजूने जाणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली आल्या. त्यांना तातडीने अधिकारी लाइफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
बोईसर-चिल्हार मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबरी पृष्ठभाग उखडला आहे. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक असल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. रस्त्याची तात्पुरती डागडुजी होत असली तरी काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
----------------------------------
तात्पुरत्या मलमपट्टीचा उपयोग काय?
खड्डे बुजवून बोईसर-चिल्हार मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावरील खड्डे, उखडलेला डांबरी पृष्ठभाग आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. संबंधित यंत्रणांनी आणखी एखादा जीव जाण्याची वाट न पाहता तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.