मुंबई

आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

CD

आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
भारत मुक्ती मोर्चा, रिपाइंसह विविध संघटनांची घोषणाबाजी

मुंबई, ता. २२ : आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटत असून, आयआयटी प्रशासनाविरोधात सलग तिसऱ्या दिवशीही विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं आणि भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २२) आयआयटी प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला न्याय द्यावा आणि यासाठी जबाबदारी असलेल्या प्राध्यापकांना तत्काळ अटक करून कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली, तर काहींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आयआयटी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी दुल्ला यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

--
परस्परविरोधी मते
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांशी जातीय भेदभाव केला जात नाही, मात्र प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यासंदर्भात काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, कारण त्यांचे कठोर नियम अधूनमधून विद्यार्थ्यांना अस्वस्थ करतात, असा दावा एका विद्यार्थ्याने या वेळी केला. तर एकाने संस्थेत काही प्राध्यापकांकडून जातीयवादाचा त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली. तर सध्या सुरू असलेल्या आंदोलनाची आता आवश्यकता नाही, कारण संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या १८ प्रमुख मागण्या आधीच मान्य केल्या आहेत. तरीही आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर बाहेरील राजकीय गटांचा प्रभाव असू शकतो, असेही एका विद्यार्थ्याने सांगितले.
--
संस्थात्मक सुधारणांसह उत्तरदायित्वाची मागणी
आयआयटीतील विद्यार्थ्यांनी संस्थात्मक सुधारणा, पारदर्शकता आणि अधिक उत्तरदायित्वाची मागणी केली. आपले आंदोलन शैक्षणिक गैरप्रकाराचे समर्थन करण्यासाठी नसून संस्थेतील व्यवस्थात्मक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा संच संचालकांकडे सादर केला असून, त्या निश्चित कालमर्यादेत राबविण्याचे आश्वासन मिळाल्याचे या वेळी सांगण्यात आले. प्रा. दुल्ला यांना प्रशासकीय कामकाजाच्या अधिष्ठाता पदावरून हटविण्याची मागणी ही त्यांना दोषी ठरविण्यासाठी नव्हती, तर चौकशी स्वतंत्र आणि निष्पक्षपणे व्हावी, यासाठी खबरदारीचा उपाय होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. चौकशीच्या निष्कर्षांनुसारच पुढील कारवाई व्हावी, अशी काही विद्यार्थ्यांची भूमिका आहे.

प्रा. दुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी दिल्ली फोरम
प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ आता आयआयटी दिल्लीतील प्राध्यापक फोरम सरसावले आहे. फोरमने आपल्या निवेदनात प्रा. दुल्ला हे परीक्षेदरम्यान मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्याविरुद्ध विविध आरोप कोणतेही विश्वासार्ह पुरावे सादर न करता सार्वजनिकरीत्या करण्यात आले आहेत. फोरम प्रा. दुल्ला, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत एकजुटीने उभे आहे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. तसेच होत असलेली आंदोलने आणि निर्माण झालेल्या मुंबईतील परिस्थितीमुळे प्राध्यापकांमध्ये परीक्षा मूल्यांकन आणि शैक्षणिक प्रामाणिकता टिकवून ठेवण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे, असेही फोरमने म्हटले.

आमच्या मुलाला न्याय मिळेल!
‘प्रशासन आणि संविधानावर त्यांचा पूर्ण विश्वास असून, आपल्या मुलाला न्याय मिळेल,’ असा विश्वास साहिलच्या आई-वडिलांनी आज व्यक्त केला. वडील रवींद्र वाकोडे म्हणाले, या प्रकरणातील आरोपींची चौकशी करून त्यांना अटक झाली पाहिजे. अटक झाल्यानंतरच सर्व सत्य बाहेर येईल, मात्र ‘साहिल हुशार विद्यार्थी होता. परीक्षेत गैरप्रकार केला, हे आरोप निराधार आहेत. प्रकरणाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तर आई सोनाली वाकोडे यांनी सांगितले की, ‘साहिलने आम्हाला सांगितले होते की, त्याला त्रास दिला जात आहे आणि जातिवाचक अपशब्द वापरले जात आहेत. आम्ही त्याला सतत सांगत होतो की आपले भविष्य खूप चांगले असणार आहे. कदाचित तीच आमची चूक झाली. त्या दिवशी आम्ही त्याला आमच्यासोबत घेऊन आलो असतो, तर आज माझे मूल जिवंत असते.’

Remarks :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT