मुंबई

अधिकाराचा आभासी वापरावरून ईडीची खरडपट्टी

CD

अधिकाराच्या आभासी वापरावरून ईडीची खरडपट्टी

राजेंद्र लोढा यांची ‘पीएमएलए’अंतर्गत कोठडी रद्द

सकाळ वृत्तसेवा,

मुंबई, ता. २२ : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कृतीला ‘अधिकाराचा आभासी वापर’ असल्याचे संबोधून उच्च न्यायालयाने लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) देण्यात आलेले कोठडीचे आदेश रद्द करून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. ईडीला  मनमानी पद्धतीने अटक करण्यासाठी विद्यमान न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

लोढांच्या अटकेसाठी आवश्यक असलेला कोणताही पुरावा किंवा नवीन परिस्थिती उद्भवली नव्हती. त्यामुळे त्यांची ही अटक बेकायदा होती, असा दावा लोढांकडून करण्यात आला. ईडीने लोढांच्या या दाव्याला विरोध केला. तसेच पीएमएलएच्या कलम १९ अन्वये अटक करण्याचा यंत्रणेचा अधिकार हा कलम ५० अन्वये चौकशीच्या प्रलंबित आदेशांपासून स्वतंत्र असल्याचा युक्तिवाद केला. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने ईडीचा युक्तिवाद फेटाळून लावला. तसेच नवीन पुराव्याशिवाय न्यायालयाच्या मान्यतेने सुरू असलेली चौकशी प्रक्रिया अर्धवट सोडणे हे कायद्याच्या मूळ उद्देशाला किंवा वैधानिक रचनेला बाधा आणणारे आहे, असे निरीक्षण नोंदवले. याशिवाय अशा प्रकारे अटक करण्याचा अधिकार वापरणे म्हणजे ईडीकडून अधिकाराचा आभासी वापर करण्यासारखे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दोन गुन्हे दाखल
लोढांविरोधात सप्टेंबर २०२५ मध्ये दोन गुन्हे दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. पुढे २९ जानेवारी २०२६ला ईडीने पीएमएलए विशेष न्यायालयाकडे अर्ज करून लोढांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ३० जानेवारीला ईडीला ही परवानगी दिली आणि २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीला जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. मात्र लोढा यांची चौकशी करण्याऐवजी ईडीने १२ फेब्रुवारीला जुन्या माहितीच्या आधारे कायद्याच्या कलम १९ अन्वये लोढांना अटक केली. त्या अटकेला लोढांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT