मुंबई

विशाखा राऊतांना तुर्तास दिलासा

CD

विशाखा राऊतांना तूर्तास दिलासा
जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला.
न्यायालयाने राऊत यांची नगरसेवक पदाची जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच निवडणूक आयोग आणि राऊत यांच्या शिवसेनेतील प्रतिस्पर्धी प्रिया सरवणकर गुरव यांना नोटीस बजावली. विशाखा राऊत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तातडीने कोणतीही निवडणूक न घेण्याचे आदेश न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्याची नगरसेवक पदाची जागा सध्या रिक्त ठेवावी तसेच अपील प्राधिकरणाने इतर कोणत्याही तथ्यांच्या प्रभावाखाली न येता प्रलंबित अपिलावर निर्णय घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिले. दरम्यान, मुंबई महापालिका अधिनियम, १९८८ च्या कलम १६(१सी)(ए) अन्वये जागा आपोआप रिक्त झाल्याचे घोषित करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पत्राला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्या २ सप्टेंबरच्या निर्णयाला राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
जात प्रमाणपत्राबाबतचे विशाखा राऊत यांचे वैधानिक अपील विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असेपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी. राजकीय प्रतिस्पर्धी सरवणकर यांना ती जागा देऊ नये, अशी विनंतीही राऊत यांच्याकडून ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT