मुंबई

उर्दू शाळेची इमारत लवकरच पूर्ण

CD

उर्दू शाळेची इमारत लवकरच पूर्ण
३७ लाखांच्या कामाला गती; दोन महिन्यांत लोकार्पणाची ग्वाही
रोहा, ता. ४ (बातमीदार) : तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या खैरे खुर्द उर्दू शाळेच्या इमारतीचे काम आता मार्गी लागले आहे. सुमारे ३७ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
खैरे खुर्द उर्दू शाळेच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. २) झाले. या वेळी तटकरे यांनी शाळेची इमारत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि परिसराच्या दृष्टीने आकर्षक असावी, तसेच बांधकामाचा दर्जा कायम राखण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
चणेरा परिसरातील म्हसाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. धरणामुळे पाणीपुरवठ्याबरोबरच परिसराच्या विकासाला आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते, असे तटकरे यांनी नमूद केले. तसेच या भागात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्याच्या भूमिपूजनासाठी पुन्हा येण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी जि.प.चे उपाध्यक्ष मधुकर पाटील, पं. स. सभापती विजया पाशिलकर, प्रवक्ते ॲड. मनोजकुमार शिंदे, माजी जि.प. सदस्य रामचंद्र सकपाळ, उपसभापती संजय मांडलुस्कर, सरपंच मुजम्मील गिते, पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

किनारी सुरक्षेसाठी पाठपुरावा
अलीकडील समुद्र दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवेआगर, हरिहरेश्वर, काशीद, अलिबागसह विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना उभारण्याची गरज तटकरे यांनी व्यक्त केली. पर्यटकांना समुद्राचा आनंद सुरक्षितपणे घेता यावा, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT