मुंबई

मूक जीवांसाठी महापालिकेने उघडले उपचाराचे दार

CD

मूक जीवांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयाचा आधार
सात महिन्यांत तीन हजार प्राणी-पक्ष्यांवर उपचार
वाशी, ता. ९ (बातमीदार) : मनुष्यबळाअभावी अनेक वर्षे बंद असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या जुईनगर सेक्टर-२४ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात अखेर उपचारसेवा सुरू झाली आहे. गेल्या सात महिन्यांत सुमारे तीन हजार आजारी आणि जखमी प्राणी-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, नवी मुंबईसह ठाणे, कल्याण आणि पनवेल परिसरातील प्राणीप्रेमींसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरत आहे.
नवी मुंबईत सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या भूखंडावर महापालिकेने दोन मजली इमारत उभारली. मात्र, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही इमारत दीर्घकाळ वापराविना होती. अखेर १० मार्च २०२६ रोजी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला.
सध्या भटके श्वान, मांजरे तसेच घार, कावळे, कबुतरे यांसारख्या जखमी पक्ष्यांवर येथे उपचार केले जात आहेत. अवघ्या २०० रुपयांच्या नाममात्र शुल्कात वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. दररोज ४५ हून अधिक प्राणी-पक्ष्यांवर उपचार केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध
बाह्यरुग्ण सेवेसोबतच रुग्णालयात शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. महिनाभरापूर्वी जखमी श्वानाच्या पायावर तसेच एका मांजरीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आगामी काळात शस्त्रक्रिया आणि विशेष वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मूक प्राणी-पक्ष्यांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालयाच्या सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT