मुंबई

महागाईने कोंडी, कर्जाने ओढाताण!

CD

महागाईने कोंडी, कर्जाने ओढाताण!
वाढत्या खर्चात व्याजदरवाढीची भर; सर्वसामान्यांच्या बचतीवर, कौटुंबिक अर्थसंकल्पावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : आधीच पेट्रोल, गॅस महागाईमुळे त्रस्त असलेल्‍या सर्वसामान्य नागरिकावंर आता गृहकर्जाचा हफ्ता महागण्याचा भार सोसावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का वाढ केल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना जास्त व्याजदर द्यावा लागेल, पण बँकेतील ठेवीदारांनाही फायदा होईल, असे सांगितले जात आहे, मात्र या निर्णयाचा फटका आधीच महागाईपासून त्रस्त असलेल्यांचे सर्वसामान्यांना अधिक बसणार असल्याचे सांगण्यात येते.
रिझर्व्ह बँकेने रेपोदरात वाढ केली की कर्जांचे व्याजदर वाढवणे आणि ठेवींवरही ज्यादा व्याज देणे बँकांना भाग पडते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामागोमाग लगेच बजाज फायनान्स ने ठेवीवरील व्याजदर वाढवले. त्यामुळे आता त्याचे अनुकरण अन्य बँकाही करतील. त्यानंतर वाहन कर्ज, गृहकर्ज, पर्सनल लोन ही कर्जे घेणाऱ्यांनाही जास्त व्याज द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
समीर हवाले यांचा या दिवाळीत नवीन वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्याचा विचार होता; मात्र रेपोरेट वाढल्यामुळे कर्जाचा मासिक हफ्ता वाढणार आहे. त्यामुळे एकतर वाहन खरेदी पुढे ढकलावी किंवा तुलनेने कमी किमतीचे वाहन घ्यावे असा विचार समीर यांचा सुरू आहे. आधीच महागाई वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनीहा निर्णय घेतल्याचे समीर यांनी सांगितले.

गुंतवणूक सल्लागार विनायक कुलकर्णी म्‍हणाले, खरे पाहता हल्ली बँकादेखील फक्त अल्प आणि मध्यम मुदतींच्या ठेवीवरच व्याजदर वाढवतात, तेही फार वाढवत नाहीत, मात्र दरवाढीचा खरा फटका कर्जदारांना बसेल. कारण त्यांच्या कर्जाच्या ईएमआयची रक्कम वाढेल किंवा कर्जफेडीची मुदत वाढेल, अशी शक्‍यता त्‍यांनी व्यक्‍त केली.
महागाईमुळे अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य आणि प्रवासाचा खर्च वाढला आहे. त्यात कर्जाचा ईएमआय वाढला, तर महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण होईल. व्याजदर वाढीचा परिणाम थेट फटका आमच्या बचतीवर आणि दैनंदिन खर्चावर पडणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक जयंत जाधव यांनी दिली.


व्याजदर आणखी वाढल्यास ईएमआय वाढेल किंवा कर्जफेडीचा कालावधी वाढेल. घरखर्च, शिक्षण आणि इतर वाढत्या खर्चांमध्ये बचत करणे त्यामुळे आणखी कठीण होईल.
- नम्रता गवळे, महिला

रिझर्व्ह बँकेने रेपोरेट पाव टक्क्यांनी वाढवले आहेत, पण त्यामुळे महागाई नियंत्रण येणार नाही. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देताना त्यामध्ये एक ते दीड टक्का व्याजदर वाढू शकतात.
- विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Maharashtra Live News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नवी मुंबईत भावुक क्षण; रांगोळीतून दिली अनोखी श्रद्धांजली

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT