मुंबई

तब्बल २९ वर्षे पुनर्वसनाचा वनवास

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : रस्ता रुंदीकरणासाठी दुकानावर हातोडा पडला, महापालिकेने पुनर्वसनाचे पत्रही दिले; मात्र तब्बल २९ वर्षे उलटूनही पर्यायी जागा मिळाली नाही. शास्त्रीनगरमधील ज्येष्ठ नागरिकाची ही व्यथा ऐकून आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित रहिवाशाचे आठ दिवसांत पुनर्वसन करा अन्यथा प्रशासनाला आमच्या स्टाईलने उत्तर देऊ, असा थेट अल्टिमेटम त्यांनी स्थावर मालमत्ता विभागाला दिला.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या १३४व्या कार्यक्रमात हा प्रकार समोर आला. शास्त्रीनगर, वर्तकनगर येथील रहिवाशाने निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली. १९९७ मध्ये रस्ता रुंदीकरणात त्याचे दुकान पाडण्यात आले. त्यानंतर महापालिकेने पुनर्वसनाचे पत्र दिले; मात्र प्रत्यक्ष पुनर्वसनाचा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. दुकान पाडले गेले, आश्वासन मिळाले; पण न्यायासाठी महापालिकेचे उंबरठे झिजवण्याची वेळ या नागरिकावर आली आहे. दुकान पाडले तेव्हा संबंधित रहिवासी ४० वर्षांचे होते. आज ते ६९ वर्षांचे झाले आहेत. आयुष्याची महत्त्वाची वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत गेली, तरी प्रशासनाला जाग आलेली नाही. ज्या अधिकाऱ्याने पुनर्वसनाचे पत्र दिले ते निवृत्त झाले; मात्र संबंधित नागरिक २९ वर्षे हेलपाटे मारून टायर्ड झाले, अशा शब्दांत केळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

दूषित पाणी, हॉटेलमधील मारहाणीचाही मुद्दा
कळवा येथील रहिवाशांनी दूषित पाण्याची बाटली आणून तक्रार मांडली. मलनिस्सारण वाहिनी फुटल्याने जवळच्या जलवाहिनीतील पाणी दूषित झाल्याचा दावा त्यांनी केला. यावर केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्थळपाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हबीबी हॉटेलमध्ये ग्राहक आणि त्यांच्या आईला मारहाण झाल्याच्या प्रकरणातही केळकर यांनी पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

SCROLL FOR NEXT