भुयारी मेट्रोचा प्रवास संस्मरणीय होणार
- एमएमआरसीकडून मेट्रो पासपोर्ट आणि स्टेशन स्टॅम्प ट्रेलची विक्री सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मेट्रो-३ आरे-कफ परेड या भुयारी मेट्रो मार्गिकेवरील प्रवास आता संस्मरणीय होणार आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरस) भुयारी मेट्रोच्या १० स्थानकांवर आजपासून ॲक्वा लाइन पासपोर्टची विक्री सुरू केली आहे. सदरचा पासपोर्ट कफ परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, वरळी, सिद्धिविनायक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), सीएसएमआयए-टी२ आणि मरोळ नाका या मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. मेट्रो-३ च्या संपूर्ण मार्गाच्या संचालनाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या पासपोर्टची निर्मिती करण्यात आली असून, त्यावर निवडक स्थानकांची माहिती आणि परिसराची ओळख करून देणारी वैशिष्ट्ये आहेत.
एमएमआरसीने ‘ॲक्वा लाइन पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’ या उपक्रमांतर्गत सुरू केलेला हा मर्यादित आवृत्तीच्या ॲक्वा लाइन पासपोर्टच्या माध्यमातून प्रवासी, मेट्रोप्रेमी, पर्यटक आणि मुंबईला भेट देणाऱ्यांना भुयारी मेट्रो मार्गिकेचा अनुभव घेताना विशेष स्थानक स्टॅम्प संकलित करण्याची अनोखी मिळाली आहे. या ॲक्वा लाइनवर आधारित पासपोर्टची किंमत २५० रुपये असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असलेल्या या पासपोर्टमध्ये पोस्टकार्डच्या धर्तीवरील कलाकृतींचा समावेश आहे. तसेच स्टॅम्पसाठी स्वतंत्र पाने देण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे ॲक्वा लाइन ही भारतातील स्वतःचा स्वतंत्र पासपोर्ट आणि १० स्थानकांवर आधारित स्टॅम्प ट्रेल सुरू करणारी पहिली मेट्रो ठरली आहे. या उपक्रमाद्वारे मेट्रो प्रवास अधिक रंजक आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रवाशांना मेट्रोच्या १० स्थानकांवरून स्टॅम्प संकलित करून आपला ॲक्वा लाइन स्टॅम्प ट्रेल पूर्ण करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.