मुंबई

पक्ष्यांचे अधिवास रोषणाईने हिरावले!

CD

पक्ष्यांचे अधिवास रोषणाईने हिरावले!
फांद्यांचीही छाटणी, पर्यावरणप्रेमींचा संताप
कांदिवली, ता. १३ (बातमीदार) : दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाईचा झगमगाट करताना निसर्ग आणि पर्यावरणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कांदिवली पश्चिम परिसरात दिसत आहे. स्वामी विवेकानंद मार्ग, महात्मा गांधी मार्ग आणि महावीर नगर परिसरातील गौरव हाईट्स, प्राणिक गार्डन, पुष्पा हेरिटेज आणि राज हाईट्स यांसारख्या अनेक सोसायट्यांनी परिसरातील तसेच रस्त्यालगतच्या वृक्षांवर विद्युत दिवे, बल्ब आणि कंदील लावून रोषणाई केली आहे.
या कृत्रिम प्रकाशामुळे वृक्षांवर वास्तव्य करणाऱ्या पक्षी आणि कीटकांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रोषणाईसाठी काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची छाटणीही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वृक्षांच्या फांद्यांवर दिव्यांच्या माळा गुंडाळणे, खिळे ठोकणे किंवा इतर साहित्य लावणे यामुळे वृक्षांचे नुकसान होत आहे. रोषणाईसाठी फांद्यांची छाटणी करण्याचे प्रकारही घडत आहेत. सणाच्या आनंदात मुक्या जीवांच्या त्रासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
वृक्षांवर विद्युत रोषणाई करणाऱ्या सोसायट्यांसह अशा प्रकारची सजावट करणाऱ्या ठेकेदारांवरही कठोर कारवाई करावी. महापालिकेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी समाजसेवक आशीष पाटील यांनी केली.
पर्यावरणप्रेमी भूपेश कदम म्हणाले, दिवृक्षांवरील विद्युत रोषणाईमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेने संबंधित सोसायट्यांवर कठोर कारवाई करावी.

कारवाईचे आश्‍वासन
वृक्षांवर विद्युत रोषणाई करणे चुकीचे आहे. विभागातील अशा सोसायट्यांची पाहणी करून त्यांना समज देण्यात येईल. तसेच नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे दक्षिण विभागाचे उद्यानविद्या अधिकारी संजय नवरे यांनी सांगितले.

नैसर्गिक अधिवास जपणे महत्त्वाचे
विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना उरलेल्या वृक्षांचेही सणासुदीच्या नावाखाली नुकसान होणे ही चिंतेची बाब आहे. सण साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दिव्यांच्या झगमगाटापेक्षा वृक्षांवरील पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT