सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून सायबर भामट्यांनी वसंत विहार परिसरातील ६० वर्षीय महिलेला १० लाख ६१ हजार ६० रुपयांचा गंडा घातला. सुरुवातीला संकेतस्थळावर नफ्याची रक्कम दाखवून विश्वास संपादन केला. मात्र, पैसे काढण्यासाठी आणखी २४ लाख रुपये भरण्याची अट घातल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
परिनिता मेहरा असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्या सल्लागार व्यवसाय करतात. ८ ऑक्टोबरला त्यांना व्हॉट्सॲपवर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात संदेश आला. त्यानंतर तानिया कपूर नावाच्या महिलेने संपर्क साधून संस्थात्मक समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के परतावा मिळण्याचे प्रलोभन दाखवले. एका संकेतस्थळावर नोंदणी करून आधारकार्ड आणि बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना १६७ सदस्य असलेल्या व्हॉट्सॲप गटात सहभागी करण्यात आले. हितेंद्र दवे नावाची व्यक्ती गुंतवणुकीचे मार्गदर्शन करीत होती, तर अन्य सदस्य नफ्याचे छायाचित्र प्रसिद्ध करीत होते. त्यामुळे विश्वास बसलेल्या मेहरा यांनी २२ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने १० लाख ६१ हजार ६० रुपये गुंतवले. संकेतस्थळावर नफा दिसत असला तरी पैसे काढताना आणखी २४ लाखांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोर्टलवर तक्रार केली. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.