मुंबई

झाडांवर रोषणाई करणारे पोलिसांच्या रडारवर

CD

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : सण-उत्सवांच्या काळात जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई आणि सजावट करून त्यांच्या नैसर्गिक वाढीला बाधा आणणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कार्यवाहीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेने केलेल्या मागणीची दखल घेत पोलिस आयुक्त कार्यालयाने संबंधित पोलिस उपायुक्तांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
ठाणे शहरात सण-उत्सवांच्या काळात झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर विद्युत दिव्यांच्या माळा, तारा; तसेच सजावटीचे साहित्य लावले जाते. या प्रकारामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्यासोबतच पक्षी, कीटक आणि अन्य जीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे जिवंत झाडांवरील विद्युत रोषणाई आणि सजावट रोखून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत पोलिस आयुक्त कार्यालयाने ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलिस उपायुक्तांकडे पाठवले आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती निवेदनकर्त्याला देण्याचे निर्देश दिले आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाल्याचे संस्थेचे डॉ. प्रमोद साळसकर यांनी सांगितले. झाडे ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून पक्षी आणि कीटकांचे अधिवास आहेत. उत्सव साजरे करताना त्यांच्या अस्तित्वाला बाधा पोहोचू नये, यासाठी सजावटीऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT