मुंबई

एमआयडीसीच्या पाण्यावर धुलाईचा धंदा?

CD

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नागरिकांना पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे मात्र अंबरनाथ-काटई मार्गावर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांनाच अनधिकृत जोडण्या देऊन लाखो लिटर पाण्याची चोरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीच्या पाण्यावर वाहन धुलाई केंद्राचा व्यवसाय तेजीत सुरू असून, या पाणीचोरांना नेमके कुणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता परिसरातील २७ धुलाई केंद्रे एमआयडीसीच्या रडारवर आली असून, त्यांच्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.

अंबरनाथ ते काटई मार्गावर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्या आहेत. याच जलवाहिन्यांना थेट अनधिकृत जोडण्या देऊन काही वाहन धुलाई केंद्रे आणि टँकर चालक पाण्याचा बेकायदा उपसा करत असल्याचे समोर आले आहे. या मार्गावर जवळपास २७ वाहन धुलाई केंद्रे आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या केंद्रांवर वाहनांची मोठी गर्दी होती. हजारो वाहनांच्या धुलाईसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरण्यात आले. हे पाणी अधिकृत जोडण्यांमधून घेतले होते की मुख्य जलवाहिन्यांमधून त्याची चोरी करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. काही टँकरचालक मुख्य जलवाहिन्यांना थेट जोडण्या घेऊन पाणी चोरत असल्याचा संशय आहे. त्यानंतर हे पाणी परिसरातील विहिरींमध्ये साठवून टँकरद्वारे विकले जात असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहन धुलाई केंद्रांबरोबरच पाण्याच्या अवैध विक्रीचे जाळेही कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.
पावसाचे प्रमाण घटल्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांनाही पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अशा परिस्थितीत एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांमधून खुलेआम पाणी चोरी होत असल्याने प्रशासनाच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारवाई सुरू
या प्रकाराची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. एमआयडीसीचे अधिकारी श्रीकांत राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिन्यांना अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. नुकत्याच एका टँकरचालकाविरोधात पाणीचोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कल्याण विभागात गेल्या आठवड्यात तब्बल ४७ अनधिकृत जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

२७ धुलाई केंद्रांची तपासणी
अंबरनाथ-काटई मार्गावरील सर्व २७ वाहन धुलाई केंद्रांची लवकरच सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रांना पाणी कुठून मिळते, जलवाहिन्यांशी अनधिकृत जोडण्या आहेत का आणि प्रत्यक्षात किती पाणी वापरले जाते, याची पडताळणी केली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा एमआयडीसी प्रशासनाने दिला आहे. मात्र, ४७ अनधिकृत जोडण्या तोडून आणि एका टँकरचालकावर गुन्हा दाखल करूनही पाणीचोरीला आळा बसणार का, हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT