मुंबई

टोलेजंग इमारतींना परवानगी; आगीवर नियंत्रण मिळवणार कसे?

CD

टोलेजंग इमारतींच्या आगीवर नियंत्रण मिळवणार कसे?
३२ ते ४० मजली इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नवी मुंबई अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः पुनर्विकासाच्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, शहरात ३२ ते ४० मजली टोलेजंग इमारतींची संख्या वेगाने वाढत आहे, मात्र अशा उंच इमारतींना आग लागल्यास ती विझविण्यासाठी आणि वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाकडे पुरेशी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भविष्यात उंच इमारतींमध्ये आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात मागील वर्षी अत्याधुनिक मॅगिरस मॉडेलचे टर्नटेबल लॅडर अर्थात शिडीचे वाहन दाखल करण्यात आले आहे. या वाहनाची कार्यक्षम उंची ६८ मीटर म्हणजेच सुमारे २२३ फूट आहे. साधारणतः २३ ते २५ मजल्यांपर्यंतच्या इमारतींमध्ये आग विझविण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरते, मात्र पालिका प्रशासनाकडून शहरात ३२ ते ४० मजली इमारतींना बांधकाम परवानगी दिली जात असताना, अग्निशमन दलाच्या उपलब्ध शिडीची कार्यक्षम उंची आणि प्रस्तावित इमारतींची उंची यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इमारतींच्या वरच्या मजल्यांवर आग लागल्यास अग्निशमन दलाला कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवावे लागणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या काळात अवघ्या चार दिवसांत नवी मुंबईत आगीच्या ९० घटना घडल्या, तर ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरात लागलेली आग विझवितानाही अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम असणे गरजेचे
उंच इमारतींमध्ये आग लागल्यास केवळ शिडीच्या वाहनावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणा, फायर लिफ्ट, स्वतंत्र अग्निशमन जलसाठा, अंतर्गत पाइपलाइन, स्प्रिंकलर यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग सक्षम असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ, आधुनिक उपकरणे आणि नियमित आपत्कालीन सराव असणेही तितकेच गरजेचे आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक मॅगिरस मॉडेलचे टर्नटेबल लॅडर अर्थात शिडीचे वाहन दाखल करण्यात आले आहे. या वाहनाची कार्यक्षम उंची ६८ मीटर असून, दुसऱ्या टर्नटेबल लॅडरचे काम सुरू आहे. त्याची क्षमताही ६८ मीटर आहे. शहरातील वाढत्या उंच इमारती लक्षात घेता अशा इमारतींमधील आग विझविण्यासाठी अधिक उंचीच्या टर्नटेबल लॅडरचा अग्निशमन दलाच्या ताफ्यात समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- पुरुषोत्तम जाधव, केंद्रप्रमुख, नवी मुंबई महापालिका अग्निशमन दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger Politics : "भाजपला दूर ठेवून आम्ही पुढे कसे जाणार?"; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणातील सर्वात मोठा पेच उघड!

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

SCROLL FOR NEXT