मुंबई

ठाण्यात दोन घरफोडीच्या घटना

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : शहरातील उथळसर आणि सावरकरनगर परिसरात घरफोडी व चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी रोख रकमेसह मोबाईल आणि लॅपटॉप असा एकूण तीन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राबोडी आणि वर्तकनगर पोलिस ठाण्यांत चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावरकरनगरमधील एका घटनेतील संशयित चोरटा इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उथळसर येथील यासीन चाळीत राहणारे सामू तिवारी यांच्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. १० नोव्हेंबरला पहाटे साडेचार ते सकाळी दहा या वेळेत ही घटना घडली. तिवारी यांनी भाजीपाल्याच्या व्यवसायातून जमा झालेली रक्कम एका बॅगेत ठेवली होती. चोरट्यांनी ही बॅग पळवून नेली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सावरकरनगर येथील सोमनाथ प्लाझा इमारतीत घडली. येथून लॅपटॉपसह तीन महागडे मोबाईल आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १२ नोव्हेंबरला सकाळी हा प्रकार उघडकीस आला. इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित व्यक्ती दिसून आली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन्ही घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT