मुंबई

खावडा-४ सी प्रकल्पाचा मोबदला सरकारच्या निकषांनुसारच

CD

भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : गुजरात ते पडघादरम्यान उभारण्यात येणाऱ्या खावडा-४ सी वीज पारेषण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतजमिनींचा मोबदला सरकारने निश्चित केलेल्या दरानुसारच दिला जात असल्याचा दावा कंपनी प्रशासनाने केला आहे. स्थानिक प्रशासनाने सध्याच्या बाजारभावानुसार मोबदल्याचे दर निश्चित केले असून, भविष्यात सरकारच्या नियमांनुसार मोबदल्याचे नवे दर लागू झाल्यास त्यांची अंमलबजावणी करण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खावडा-४ सी प्रकल्पामुळे भिवंडी तालुक्यातील बाधित जमिनींच्या मोबदल्याचे दर निश्चित किंवा त्यात बदल करण्याचा वैधानिक अधिकार वीज पारेषण कंपनीला नाही. महाराष्ट्रात वीज पारेषण सुविधांचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू असताना बाधित होणाऱ्या जमीनमालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याचे निकष समजून घेणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत जमिनीचा वापर, बाधित क्षेत्रफळ आणि संबंधित मूल्यांकन निकषांचा विचार केला जातो. वीज पारेषण प्रकल्पांमुळे बाधित जमिनींच्या मोबदल्याचे नियमन सक्षम स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांनुसार केले जाते. त्यानुसार भिवंडीतील बाधित जमिनींसाठी प्रतिचौरस मीटर ३,३०० रुपये मोबदला दर अंतिम करण्यात आला आहे. कंपनी मोबदल्याचे दर निश्चित करत नाही किंवा त्यात बदलही करत नाही. सक्षम प्राधिकरणाने कायदेशीररीत्या निश्चित केलेल्या दरांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कंपनी पार पाडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जमिनीच्या मोबदल्याव्यतिरिक्त उभ्या पिकांचे, फळझाडांचे आणि अन्य झाडांचे नुकसान याची भरपाई संबंधित शासकीय विभागांच्या प्रचलित धोरणांनुसार स्वतंत्र दिली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT