मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांपैकी सात अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अर्ज माघारीची मुदत गुरुवारी (ता. १२) संपल्यानंतर सर्व १५ जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
तालुक्यातील सहकार क्षेत्रात माजी आमदार गोटीराम पवार आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वर्चस्वाची लढाई होती. शेतकरी सहकारी संघावर गोटीराम पवार गटाची सत्ता होती. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर सरकारने जून २०२५ मध्ये संघावर प्रशासकीय मंडळ नियुक्त केले होते. या मंडळात कथोरे समर्थकांचा समावेश होता. दरम्यान, गेल्या वर्षी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. कथोरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले सुभाष पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीतही त्याचे प्रतिबिंब उमटले. गोटीराम पवार आणि कथोरे यांच्या संमतीने उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे चित्र आहे. संघाच्या संचालक मंडळात एकूण १५ जागांचा समावेश आहे. त्यापैकी शेती सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी १०, महिला राखीव दोन, तर इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.