पनवेल, ता. १३ (बातमीदार) : मराठी साहित्यविश्वातील दिवाळी अंकांची परंपरा समृद्ध करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरीव वाढ करण्यात आली असून, राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी तब्बल दीड लाख रुपये, तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी ६० हजारांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही देशातील सर्वाधिक बक्षीस रकमेची दिवाळी अंक स्पर्धा ठरली आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेत राज्यस्तरीय विभागात द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत. उत्कृष्ट कथा, कविता, लेख, परिसंवाद, मुलाखत, व्यंगचित्र आणि मुखपृष्ठासाठीही स्वतंत्र पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. बालसाहित्य, विशेषांक आणि उत्कृष्ट दिवाळी अंकांनाही गौरविण्यात येणार आहे.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाला ३० हजार, तर तृतीय क्रमांकाला १५ हजार रुपये मिळतील. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथमच डिजिटल दिवाळी अंकांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि पाय हजार रुपये दिले जाणार आहेत.
स्पर्धेसाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती आणि १०० रुपये प्रवेश शुल्क १ डिसेंबरपर्यंत मंडळाच्या पनवेल येथील कार्यालयात पाठवावे. डिजिटल अंक mmps.president@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर, संदीप चव्हाण आणि शैलेश शिर्के यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.