मुंबई

वाढीव वीज बिलांविरोधात महिलांचा मोर्चा

CD

वाढीव वीजबिलांविरोधात महिलांचा मोर्चा
जनवादी महिला संघटनेचे आंदोलन; महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

कासा, ता. १३ (बातमीदार) : अवाजवी आणि वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याच्या निषेधार्थ जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १३) महावितरण कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील कष्टकरी कुटुंबांना वाढीव बिलांचा आर्थिक भार सहन करणे कठीण होत असल्याने महिलांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.

गेल्या काही दिवसांपासून अनेक वीजग्राहकांना अपेक्षेपेक्षा अधिक रकमेची बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ही बिले भरणे जिकिरीचे ठरत असून, घरखर्चाचे नियोजनही विस्कळित होत आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील कष्टकरी कुटुंबांना या वाढीव बिलांचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची भूमिका आंदोलक महिलांनी मांडली.

मोर्चादरम्यान चुकीची आणि अवाजवी वीजबिले तातडीने दुरुस्त करावीत, बिलांमधील त्रुटींची सखोल चौकशी करावी, ग्राहकांना योग्य आकारणीची बिले द्यावीत आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. वीज ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असल्याने ग्राहकांना परवडणारी बिले मिळणे आवश्यक असल्याचेही महिलांनी स्पष्ट केले.

या मोर्चात जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉ. लहानी दौडा, निलीमा माळी, लता घोरखना, रुपी राठोड यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर डहाणू महावितरण कार्यालयातील अधिकारी गणेश दंडगव्हाळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

MPSC गट-क भरती; १६,७१७ पदांसाठी आजपासून भरता येणार अर्ज; आधी फॉर्म भरलेल्यांनाही मिळणार नव्या संवर्गांचा पर्याय

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईतील SBIच्या ग्लोबल आयडी सेंटरवर सायबर हल्ला

liquor delivery scam : मद्य घरपोच सेवेच्या नावाखाली पुण्यात ग्राहकांची फसवणूक; बनावट संकेतस्थळ तयार करून सायबर चोरट्यांनी लुटले सुमारे एक लाख रुपये

SCROLL FOR NEXT