मुंबई

उरणमध्ये रांगोळी प्रदर्शनाला प्रतिसाद

CD

उरणमध्ये रांगोळी प्रदर्शनाला प्रतिसाद
२२ कलाकारांच्या कलाकृती ठरल्या लक्षवेधी
उरण, ता. १३ (वार्ताहर) : दिवाळीनिमित्त उरण येथील एनआय हायस्कूलमध्ये रंगवल्ली कलादर्शन संस्थेतर्फे १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान सहा दिवसांचे विनामूल्य रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात २२ कलाकारांनी विविध मान्यवरांची व्यक्तिचित्रे आणि आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे व्यक्तिचित्र विशेष लक्षवेधी ठरत आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून हे प्रदर्शन भरविण्यात येत असल्याची माहिती कलावंत राजेश नागवेकर यांनी दिली.
प्रदर्शनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, दिवंगत अभिनेते नाना पाटेकर, गणपती, हनुमान, स्वामी समर्थ, शिवशंकर, साधुसंत आणि मेंढपाळ अशा विविध विषयांवरील रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. थ्रीडी पद्धतीने साकारलेली स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि खवय्यांचे आकर्षण असलेली चिंबोरीची रांगोळीही अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये थ्रीडी, उठावदार आणि व्यक्तिचित्र रांगोळ्यांचा समावेश आहे.

नवोदितांना मिळतेय व्यासपीठ
सिद्धार्थ नागवेकर, स्वप्नाली मंचेकर, नवनीत पाटील, संतोष पाटील, राजेश नागवेकर, ध्रुव म्हात्रे, सत्या कडू, आतिष मंचेकर, पार्थ म्हात्रे, अमरनाथ पाटील, चंदन गडगे, संतोष डांगरे, अपूर्वा म्हात्रे, वैष्णवी जाधव, तेजस पाटील, विद्या वरे, वंशराज माने, विनीत म्हात्रे, वैष्णवी म्हात्रे, वैष्णवी गडगे आणि उदय पाटील या २२ कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या आहेत.

फोटो कॅप्शन : उरणमध्ये आयोजित रांगोळी प्रदर्शनात आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

आयुष्मान कार्डधारकांना धक्का! आता ११२ आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत होणार नाहीत, मोदी सरकारचा प्रस्ताव

Maharashtra Tourism: गोव्याच्या गर्दीपासून दूर, कोकणात आहे समुद्राचं हे सुंदर जग! एका बोटसफारीतून पाहता येतात १ नाही तर १२ ठिकाणं

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

SCROLL FOR NEXT