रस्ते दुरुस्तीचा विसर; अपघातांचा धोका
वसई-विरारमध्ये खड्डे, उघड्या चेंबरची समस्या
वसई, ता. १३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांची खोदकामे केली जात असली, तरी कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची पूर्ववत दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील खड्डे, तुटलेली चेंबर आणि कामानंतर साचलेली माती यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये, यासाठी स्थानिकांनी काठीला झेंडा बांधून धोक्याची सूचना केली आहे. वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज यावा आणि त्यांनी सावधगिरीने वाहने चालवावीत, यासाठी नागरिकांनीच ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. दुसरीकडे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अनेक चेंबरची झाकणे तुटलेली किंवा उघडी असल्याने वाहनांची चाके त्यात अडकण्याची शक्यता आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे आणि उघडी चेंबर सहज लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वसई-विरारच्या विकासासाठी विविध योजना आणि प्रस्ताव मांडले जात असले, तरी मूलभूत सुविधांची दुरवस्था कायम आहे. रस्त्यांची नियमित देखभाल, खड्ड्यांची दुरुस्ती आणि तुटलेल्या चेंबरची झाकणे बसविण्याची जबाबदारी प्रशासन कधी पार पाडणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.