मुंबई

सोनिया गांधीच्या बिलॉन्गिंगची देशभरात क्रेझ

CD

साेनिया गांधींच्या ‘बिलाँगिंग’ची देशभर चर्चा
आत्मचरित्राचा विक्रमी खप; आणीबाणीसह राजकीय स्थित्यंतरांचा साक्षीदार
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दिवाळीच्या सणात प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटांच्या धामधुमीत प्रकाशित झालेले काॅँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या साेनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. आणीबाणीसह राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार असलेल्या या पुस्तकावरून सध्या देशभरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काही दिवसांतच प्रत्यक्ष विक्रीबराेबरच ऑनलाइन विक्रीचा नवा मापदंड या पुस्तकाने निर्माण केला. अलीकडच्या काही वर्षांत सर्वाधिक उत्सुकता वाढवणारे पुस्तक बाजारात आल्याचे प्रकाशन क्षेत्रातील जाणकारांनी मत व्‍यक्त केले.

सोनिया गांधी यांचे बहुचर्चित पुस्तक १० नोव्हेंबरला प्रकाशित झाले. देशभरातील शंभरहून अधिक शहरांत एकाच वेळी विक्रीसाठी हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाने काही दिवसांतच विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले, असे हार्परकॉलिन्स इंडियाने सांगितले. देशभरात अनेक ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी वाचकांच्या रांगा लागल्या होत्या. पहिली आवृत्ती दाेन लाख पुस्तकांची काढल्याचे सांगण्यात येते. भारत व काही देशांत पुस्तकाचे अधिकार ‘हार्परकॉलिन्स’कडे आहेत तर काही निवडक देशांत ‘पेंग्विन’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

फोर्ट परिसरातील आयकॉनिक बुक स्टोर असलेल्या किताबखाना येथे पहिल्या तीन दिवसांत या पुस्तकाच्या ३०० प्रती हातोहात विकल्या गेल्या. १,२९९ रुपये किंमत असलेल्या पुस्तकाला एवढी मागणी मिळणे, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते, असे किताबखान्याचे व्यवस्थापक जगत टेकाडे यांनी सांगितले. मुंबईतील अनेक बुक स्टोअरमध्ये या पुस्तकाची तुफान विक्री सुरू असून, काही बुक डेपोंना अजूनही ती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांच्या या पुस्तकावरून प्रकाशनापूर्वीच वाद उभा राहिला हाेता. काही मजकूर संपादन करण्यावरून झालेल्या वादामुळे पेंग्विन प्रकाशनाकडून या पुस्तकाचे अधिकार काढून ते हार्परकॉलिन्सकडे देण्यात आले. दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि इंदिरा गांधी यांच्या स्नुषा असलेल्या सोनिया या पाच दशके अनेक राजकीय स्थित्यंतरांच्या साक्षीदार राहिल्या आहेत. आणीबाणीचा काळ त्यांनी जवळून पाहिला आहे. यातील अनेक गोष्टींचा संदर्भ या पुस्तकात असणार, या उत्सुकतेपाेटी त्यांच्या आत्मचरित्राकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ऑनलाइन अन्‌ ऑफलाइन हिट
मागणी वाढल्यामुळे ‘ॲमेझॉन’च्या मंचावरून पुस्तक ऑर्डर केल्यावर डिलिव्हरीसाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी ‘ब्लिंकिट’वरून हे पुस्तक मागवले आहे. तिकडेही अचानक मागणी वाढल्यामुळे तेथेही ‘ऑऊट ऑफ स्टाॅक’चा फलक झळकल्याने अनेकांची निराशा झाली.
-----
पुस्तकाचा प्रचंड खप पाहता अनेक दिवसाने एवढे लोकप्रिय पुस्तक आले आहे. मागणी वाढल्यामुळे अधिकची १०० पुस्तके मागवली आहेत.
- जगत टेकाडे, व्यवस्थापक, किताबखाना
...
‘ॲमेझॉन’वर पुस्तक मिळण्यास आठवडाभराचा कालावधी लागत असल्याने मी पहिल्यांदा ‘ब्लिंकिट’वरून पुस्तक मागवले. १२ मिनिटांत मला पुस्तक घरपोच मिळाले.
- अली भोजानी, सामाजिक कार्यकर्ते
..........
प्रकाशक आणि वाचकांचा पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २०२६ मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या या पुस्तकाचे देशभरात अभूतपूर्व स्वागत झाले आहे.
- हार्परकॉलिन्स इंडिया
.......
एक परदेशी वंशाची महिला पंतप्रधानपदाच्या उंबरठ्यावर उभी होती. दुसरे म्हणजे सोनिया गांधी या कित्येक दशकापासून भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. ‘बोफोर्स’सह अनेक विषयांबाबत भारतीयांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या उत्सुकतेमुळेच हे पुस्तक लोकप्रिय झाले आहे.
- डॉ. लियाकत अयूब खान, राज्यशास्त्र विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ

पुस्तक एवढे लोकप्रिय का?
१. सोनिया गांधी यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता
२. संजय गांधी, आणीबाणी यांसारख्या अनेक घटनांवर नवा प्रकाश
३. प्रकाशनापूर्वीचा वाद
४. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही पुस्तक खरेदी
५. सत्ताधाऱ्यांचे पुस्तकाकडे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT