मुंबई

एलआयजीची घरे बिगर-ईडब्ल्यूएस प्रवर्गातून विकणार

CD

एलआयजीची घरे बिगर-ईडब्ल्यूएस प्रवर्गातून
२७ नोव्हेंबरला निघणार घरांची सोडत

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बिगर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे. या प्रवर्गातील सदनिकांची बहुप्रतीक्षित सोडत येत्या २७ नोव्हेंबरला काढण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा सिडकोने केली आहे. न्यायालयाचा सकारात्मक निकाल आल्याने या सोडतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
डिसेंबर-२०२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) १.० अंतर्गत जाहीर झालेल्या या योजनेतील ईडब्ल्यूएस प्रवर्गाची सोडत यापूर्वीच पार पडली, मात्र तांत्रिक व न्यायालयीन प्रक्रियेमुळे बिगर-ईडब्ल्यू (एलआयजी) प्रवर्गाची सोडत स्थगित ठेवण्यात आली होती. आता न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावल्याने अर्जदारांच्या हक्काच्या घराचा मार्ग सुकर झाला आहे. या योजनेत नमूद करण्यात आलेला ‘एलआयजी’ हा शब्द ‘बिगर-ईडब्ल्यूएस (नॉन-ईडब्ल्यूएस)’ या अर्थाने ग्राह्य धरला जाणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
-----------------
अर्ज मागे घेण्यासाठी १० दिवसांची मुदत
या योजनेतून ज्या अर्जदारांना बाहेर पडायचे आहे किंवा सदनिकेवरील दावा सोडायचा आहे, त्यांना ही घोषणा प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत ऑनलाइन लॉगिनद्वारे आपला अर्ज मागे घेता येईल. अर्ज मागे घेणाऱ्या अर्जदारांची बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता पूर्णपणे परत केली जाईल. विनंती सादर केल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम अर्जदाराच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होईल. जे अर्जदार या १० दिवसांत अर्ज मागे घेण्याचा पर्याय निवडणार नाहीत, त्यांचा सोडतीतील सहभाग आपोआप कायम राहील आणि ते २७ नोव्हेंबरच्या सोडतीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT