मुंबई

नऊ मराठी शाळांतील स्वच्छतागृहांचा होणार कायापालट

CD

नऊ शाळांचा बदलणार चेहरामोहरा
स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी १.१० कोटींचा प्रस्ताव; सर्वसाधारण सभेसमोर विषय

पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या नऊ शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती, सुधारणा आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल एक कोटी १० लाख १७ हजार ९३२ रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता मिळवण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर नुकताच विषय ठेवण्यात आला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. मराठी शाळांची दर्जोन्नती, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरविकास विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

महापालिका क्षेत्रातील नऊ शाळांमधील स्वच्छतागृहांची सद्यःस्थिती विचारात घेऊन स्वतंत्र अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार आवश्यक दुरुस्ती, सुधारणा आणि नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत. महिला आणि पुरुष स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांच्या अंदाजपत्रकात जीएसटी आणि पाच टक्के आकस्मिक खर्चाचाही समावेश आहे.

चौकट :
या शाळांमध्ये होणार कामे
- महापालिका शाळा क्रमांक २ – दांडी
- शाळा क्रमांक ४ – कोळीवाडा
- प्राथमिक शाळा क्रमांक ५ – मोठा खांदा
- प्राथमिक शाळा क्रमांक ६ – धाकटी खांदा
- प्राथमिक शाळा क्रमांक ७ – तळका
- प्राथमिक शाळा क्रमांक ८ – पोदी
- प्राथमिक शाळा क्रमांक ९ – गुजराथी शाळा
- प्राथमिक शाळा क्रमांक १० – पनवेल उर्दू शाळा
- प्राथमिक शाळा क्रमांक ११ – तक्का उर्दू शाळा

चौकट
पाच कोटींच्या निधीतून दर्जोन्नती
मराठी शाळांची दर्जोन्नती आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत पनवेल महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या अभियानातून प्राप्त होणाऱ्या शासकीय अनुदानाचा वापर करून नऊ शाळांमधील स्वच्छतागृहांची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियमित निधीवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

चौकट
मंजुरीनंतर ई-निविदा प्रक्रिया
प्रस्तावित कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता आवश्यक आहे. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून पात्र कंत्राटदारामार्फत कामे हाती घेण्यात येतील. शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता, पुरेसे पाणी आणि वापरण्यायोग्य सुविधा या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळून कामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नऊ शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

Gadchiroli Transformation : नक्षलवादाचा काळोख संपला! महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा बनणार देशाची नवी 'स्टील सिटी'; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

हातगाडीवर भाजी विकत असतानाच लेक न्यायाधीश झाल्याची बातमी कळाली... आई-वडील भावूक... कधीकाळी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठीही नव्हते ८०० रुपये!

Marathwada Water Crisis: सरकारच्या दुर्लक्षाने मराठवाड्याचे ७ टीएमसी पाणी अडकले! दोन बोगद्यांची कामे ठप्प, पंपगृहही अपूर्ण; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला ब्रेक

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT