तक्रारीनंतर पनवेलमध्ये स्वच्छता
सेक्टर १८ मधील कचरा हटविल्याने नागरिकांना दिलासा
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : प्रभाग क्रमांक १७ मधील सेक्टर १८ येथे बँक ऑफ इंडिया शेजारील भूखंडावर कचऱ्याचे ढीग आणि वाढलेल्या झाडेझुडपांमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधित भूखंडाची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. तसेच पावसाळ्यानंतर गवत आणि झाडेझुडपे वाढल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली होती. साचलेला कचरा आणि वाढलेल्या गवतामुळे डासांची उत्पत्ती होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार करून भूखंडाची स्वच्छता करण्याची तसेच कचरा आणि वाढलेली झाडेझुडपे हटविण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत स्वच्छता मोहीम राबवली. भूखंडावरील कचरा आणि झाडाझुडपे हटविल्याने परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला आहे.
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देऊन अशा स्थानिक समस्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.