मुंबई

न्यूमोनिया प्रतिबंध मोहीमेची नवी मुंबईत सुरूवात

CD

न्यूमोनिया प्रतिबंध मोहिमेची नवी मुंबईत सुरुवात
नेरूळ, ता. १५ (बातमीदार) ः बालकांमधील न्यूमोनियाचा प्रतिबंध, त्याचे लवकर निदान व वेळेवर उपचार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत SAANS (Social Awareness and Action to Neutralize Pneumonia Successfully) मोहीमेचा नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
सदर मोहीम दि. १२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. बालकांमधील न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर हजार जिवंत जन्मांमागे ३ पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेद्वारे निश्चित करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत न्यूमोनियाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजाराचे वेळीच निदान आणि योग्य उपचार याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. विशेषतः पाच वर्षांखालील बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ‘न्यूमोनिया नाही, तर बालपण सही’ हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देऊन अतिजोखमीच्या व आजारी बालकांचा शोध घेणे, खोकला व श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी करणे, गरजेनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करणे, तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागांमध्ये संशयित न्यूमोनिया रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
यासोबतच Pneumococcal Conjugate Vaccine (PCV) लसीकरणाबाबत जनजागृती, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि बालकांच्या आरोग्यविषयक नियमित पाठपुराव्यावर भर देण्यात येणार आहे.
बालकांमधील न्यूमोनियाचे वेळेत निदान होऊन प्रत्येक बालकाला योग्य व वेळेवर उपचार मिळावेत या उद्देशाने नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत ही मोहीम सार्वजनिक रुग्णालये, माता बाल रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा विविध ठिकाणी प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT