मुंबई

बदलत्या हवामानाचा फटका

CD

बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका
नवी मुंबईत सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ
वाशी, ता. १४ (बातमीदार) : दुपारी उन्हाचा कडाका आणि पहाटे व रात्री जाणवणारा गारवा, अशा बदलत्या हवामानाचा नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून शहरातील वातावरणात गारवा वाढला आहे. पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत असली, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे नागरिकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी तसेच घसा खवखवण्यासारख्या तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीच्या काळात फराळातील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन वाढते. बदलते हवामान आणि आहारातील बदल यामुळे आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याबरोबरच आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

दरम्यान, रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरी आरोग्य केंद्रांमार्फत विशेष तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, स्वच्छता राखावी, ताजे व सकस अन्न घ्यावे आणि थंडीपासून बचाव करावा. ताप किंवा अन्य लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT