मुंबई

कलावंतांच्या नावाने उजळणार नवी मुंबईचे सांस्कृतिक विश्व!

CD

नाट्यगृहांच्या चौपट विस्ताराला मुहूर्त
तीन वर्षांत बांधकाम सुरू करण्याचे नियोजन; मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नियोजनबद्ध शहर, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या नवी मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात आता भर पडण्याची चिन्हे आहेत. शहरात आणखी चार नवीन नाट्यगृहे उभारण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. विशेष म्हणजे या नाट्यगृहांना राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांची नावे देण्याऐवजी कला आणि मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलावंतांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दादा कोंडके, विठ्ठल उमप, मच्छिंद्र कांबळी आणि नाना पाटेकर यांच्या नावांचा यासाठी विचार केला जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांनी ही माहिती दिली. सध्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह आणि ऐरोलीतील नाट्यगृहाच्या माध्यमातून शहरातील नाट्यरसिकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे. मात्र, शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्या आणि मराठी नाटकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आणखी नाट्यगृहांची गरज निर्माण झाली आहे. घणसोली, नेरूळसह अन्य विभागांत ही नाट्यगृहे उभारण्याचे नियोजन असून, येत्या तीन वर्षांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट आहे.

नाट्यगृहांच्या नामकरणाबाबतही नाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ऐरोलीतील नाट्यगृहाला आपल्या आई-वडिलांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारी पत्रे काही राजकीय नेत्यांनी दिली होती. मात्र, अशा मागण्यांना महत्त्व न देता कला क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी नाट्यगृहांची नावे निश्चित केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर आणि उपमहापौरांना विश्वासात घेऊन कोणत्या विभागातील नाट्यगृहाला कोणत्या कलावंताचे नाव द्यायचे, याबाबतची माहिती बांधकाम सुरू होण्यापूर्वी जाहीर केली जाणार आहे.

नाटकांना वाढता प्रतिसाद
मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवरील नवनवीन नाटके येत असून, त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतही नाटकांचे प्रयोग हाऊसफुल होत असल्याचे चित्र आहे. दूरचित्रवाणीवरील मालिकांमधील तोच तोपणा आणि ठरावीक कथानकांना कंटाळलेले प्रेक्षक प्रत्यक्ष रंगमंचावरील जिवंत अभिनय, कलाकारांचा थेट संवाद आणि नाट्यप्रयोगातील उत्स्फूर्तता अनुभवण्यासाठी नाट्यगृहांकडे वळत आहेत. नवी मुंबईत आणखी किमान दोन नाट्यगृहांची आवश्यकता असल्याचे मत रंगकर्मी अशोक पालवे यांनी व्यक्त केले. नव्या नाट्यगृहांमुळे व्यावसायिक दर्जाचे कलाकार घडण्यास मदत होईल. स्थानिक नाट्यसंस्था आणि कलाकारांना प्रयोगांसाठी अधिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

प्रेक्षकांचा पाठिंबा हवा

मराठी रंगभूमीवर नवनवीन नाटके, वेगवेगळे विषय आणि प्रयोगशील संकल्पना येत असल्याने रंगकर्मी म्हणून आनंद आणि समाधान वाटते, अशी भावना अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर सुनील रमेश पगार यांनी व्यक्त केली. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून संस्कृती, विचार आणि कलात्मक परंपरेचा समृद्ध वारसा आहे. नव्या नाटकांमुळे अनुभवी कलाकारांसह नवोदित लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि तंत्रज्ञांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रेमातूनच मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल, असे आवाहन पगार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

SCROLL FOR NEXT