मुंबई

दिवाळीच्या घरकामावेळी दागिन्यांची ‘सफाई’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : दिवाळीच्या सणानिमित्त घरकामासाठी ऑनलाइन ॲपवरून बोलावलेल्या महिलेनेच घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वागळे इस्टेट परिसरातील एका सोसायटीत घडलेल्या या प्रकारात आठ लाख ७६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सोहम भोईर (वय २५) हे रामचंद्रनगर येथील देव अशोका सोसायटीत कुटुंबासह राहतात. दिवाळीनिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वडिलांनी सरकारी बँकेच्या पाचपाखाडी शाखेतील लॉकरमधून दागिने घरी आणले होते. नेहमीची घरकाम करणारी महिला सुट्टीवर असल्याने कुटुंबीयांनी ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या महिलांना घरकामासाठी बोलावले होते. ९ नोव्हेंबर रोजी सोहम यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरवर ठेवले होते. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेनिमित्त दागिने घालण्यासाठी शोध घेतला असता ते गायब असल्याचे आढळले.

१० नोव्हेंबर रोजी ॲपवरून एका महिलेला घरकामासाठी बोलावण्यात आले होते. तिने हॉल, बेडरूम आणि स्वयंपाकघराची साफसफाई केली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याने याच संधीचा फायदा घेऊन तिने दागिने चोरले असावेत, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ५३ ग्रॅमचे ब्रेसलेट, १५ ग्रॅमची चेन आणि पाच ग्रॅमची अंगठी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

SCROLL FOR NEXT