मुंबई

बनावट हँड क्लिनरचा साठा जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : नामांकित कंपनीचे नाव आणि लोगोचा गैरवापर करून बनावट हँड क्लीनरची विक्री करणाऱ्या दुकानावर ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. चरई येथील जैन ट्रेडर्स या दुकानातून कॉस्बल कंपनीच्या नावाने तयार केलेले ३२ हजार ५०० रुपयांचे १३ हँड क्लीनरचे कॅन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दुकानदाराकडे चौकशी करण्यात आली असून, बनावट मालाचा पुरवठा करणाऱ्याचे नावही समोर आले आहे.

मुलुंड येथील व्यापारी स्वप्नील कोतुलकर (वय ४२) यांची रबाळे एमआयडीसी परिसरात क्वालिटी हर्बल प्रॉडक्ट्स प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीत कॉस्मेटिक उत्पादनांसह हँड क्लीनरची निर्मिती केली जाते. कंपनीच्या नावाने बनावट हँड क्लीनरची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतुलकर यांनी २८ ऑक्टोबरला चरई येथील जैन ट्रेडर्समधून ४०० रुपयांना एक कॅन खरेदी केला. त्यावर कंपनीचा लोगो, पत्ता आणि उत्पादन परवाना क्रमांकाचा वापर केल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी दुकानाची तपासणी केली असता पाच लिटर क्षमतेचे १३ कॅन आढळले. त्यावर बनावट लोगो आणि कंपनीचा परवाना क्रमांक छापण्यात आला होता. पोलिसांनी हा साठा जप्त केला. दुकानदार धनेश मुंथा (४०) याने हा माल चरईतील के. यू. विकम यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या बनावट उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा नौपाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

SCROLL FOR NEXT