मुंबई

नाहूरगाव शाळेची नवी इमारत उभारावी

CD

मुलुंड, ता. १५ (बातमीदार) : मुलुंडमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी नाहूर गाव येथील मुंबई पब्लिक स्कूलची नवीन इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १०४ मधील या शाळेची सध्याची जुनी आणि चाळ स्वरूपातील इमारत पाडून त्या जागी सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त बहुमजली इमारत बांधावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

शाळेच्या सध्याच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि बदलत्या शैक्षणिक गरजांच्या तुलनेत पुरेशी जागा व सुविधा उपलब्ध नाहीत. मर्यादित जागा, अपुऱ्या सोयी आणि आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक साधनांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचे गंगाधरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नवीन इमारतीमध्ये सुसज्ज वर्गखोल्या, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडांगण आणि बहुउद्देशीय सभागृह असावे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिका शाळांमध्ये खासगी शाळांच्या तोडीच्या सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना लाभ होईल. यामुळे पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वासही वाढेल, असा विश्वास गंगाधरे यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पासाठी जागेची पाहणी, तांत्रिक तपासणी आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच २०२७-२८ च्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात स्वतंत्र लेखा शीर्षाखाली निधीची तरतूद करून बांधकामाला गती द्यावी, अशी मागणी गंगाधरे यांनी केली आहे. नाहूर गावमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी या प्रस्तावाची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नाहूर गाव येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या इमारतीची अवस्था खूपच बिकट असून, त्यामुळे नव्याने शाळा बांधण्यात यावी. त्याचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ होईल.
- सुनील गारे, स्थानिक रहिवासी

मुलुंड : मुंबई पब्लिक स्कूलची इमारत जीर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

SCROLL FOR NEXT