‘भगवान बिरसा कला संगम’मध्ये पालघरच्या कलाकारांचा डंका
राज्यस्तरीय स्पर्धेत आठ कलाकारांची चमकदार कामगिरी
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : गडचिरोली येथे आयोजित राज्यस्तरीय ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील आठ कलाकारांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. विविध कलाप्रकारांत पारितोषिके मिळवणाऱ्या या कलाकारांचा आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्पर्धेत लघुपट प्रकारात रूपेश कडव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रील्स प्रकारात यशवंत तेलम यांनी द्वितीय, तर अक्षय धाक यांनी तृतीय क्रमांक मिळवला. व्ह्लॉग प्रकारात चेतन बुजाडा यांनी द्वितीय, ब्लॉग प्रकारात संतोष सांबरे यांनी चतुर्थ, तर विनोद मुरली राम महाकाळ यांनी ब्लॉग लेखनात पाचवा क्रमांक मिळवला. लोकगीत प्रकारात सीता गावंडा (वनवासी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून, गणपत गावंडा यांचे विशेष योगदान लाभले. चित्रकला प्रकारात पांडुरंग देऊ चौधरी यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
आदिवासी समाजातील कला, संस्कृती, परंपरा आणि भाषांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच नव्या डिजिटल माध्यमांतून या परंपरांचा प्रसार व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पालघरच्या कलाकारांनी पारंपरिक आणि आधुनिक कलाप्रकारांत मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.