मुंबई

तरुणाईच्या सहभागाने भक्तीचा उत्साह

CD

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : ठाण्यातील छठपूजेला यंदा तरुणाच्या उत्स्फूर्त सहभागासोबतच शेतकऱ्यांच्या मदतीचा सामाजिक संदेशही पाहायला मिळाला. हजारो तरुणांनी गंगा आरतीत सहभागी होत परंपरेशी नाळ जोडली, तर रुद्र प्रतिष्ठानने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाखांचे योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यामुळे श्रद्धा, तरुणाईचा उत्साह आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा अनोखा संगम छठपूजेनिमित्त ठाण्यात पाहायला मिळाला.

दिवाळीचा सण संपताच ठाणे शहरात उत्तर भारतीय समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा सण असलेल्या छठपूजेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सूर्यदेव आणि छठ मईया यांची आराधना करण्यासाठी शहरातील विविध तलावांच्या परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला शुक्रवारी ‘नहाय-खाय’ या विधीने सुरुवात झाली. शनिवारी ‘खरना’चा उपवास केल्यानंतर रविवारी (ता. १५) सायंकाळी महिलांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. उद्या (ता. १६) पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर उपवासाची सांगता होणार आहे.

छठपूजेनिमित्त उपवन तलाव, रायलादेवी तलाव, कोलशेत तसेच कळव्यातील मफतलाल मैदान परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कृत्रिम तलावांची निर्मिती, स्वच्छता, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. अग्निशमन दल, जल बचाव पथक, रुग्णवाहिका आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

उपवन तलावावर पर्यावरणपूरक छठपूजा
उपवन तलाव परिसरात रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनच्या पुढाकाराने छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २६ वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. भाविकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूजा करता यावी, यासाठी यंदा प्रथमच आगाऊ नोंदणीची टोकन व्यवस्था करण्यात आली होती. महिलांसाठी कपडे बदलण्याची सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता गंगा आरती आणि भजन संध्येने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवून रुद्र प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाखांचा धनादेश देण्यात आला. या वेळी आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, नगरसेवक संजय वाघुले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. धनंजय सिंह आणि जय फाउंडेशनचे ॲड. अमित सिंह उपस्थित होते.

रायलादेवी तलावावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वागळे इस्टेटमधील रायलादेवी तलाव संकुलात छठ मैया पूजा सेवा समितीतर्फे रोषणाई, स्वच्छता आणि पूजेची व्यवस्था करण्यात आली होती. तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी महिलांसाठी विशेष टब सुविधेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष कुलदीप तिवारी यांच्या माहितीनुसार, गेल्या २२ वर्षांपासून येथे छठपूजेचे आयोजन केले जात आहे. शिवसेना हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शशी कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालीही उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT