एकनाथ शिंदे, मीनाक्षी शिंदेंविरोधात
आक्षेपार्ह पोस्ट; दोघांविरोधात तक्रार
सोशल मीडियावरील पोस्ट हटवून कायदेशीर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुषार राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील महिला अध्यक्षा दीपा चौधरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा मलिन होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या कोपरी येथील शांतीनगर शाखाप्रमुख रिना मुदलीयार यांनी केला आहे.
मुदलीयार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ नोव्हेंबरला दुपारी आनंद आश्रम येथे उपस्थित असताना त्यांना समाजमाध्यमांवर तुषार राणे यांच्या खात्यावरून एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट त्यांच्या निदर्शनास आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा संदर्भ देत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारा मजकूरही या पोस्टमध्ये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच दीपा चौधरी यांनीही मीनाक्षी शिंदे यांच्याविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या पोस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, कँडल मार्चदरम्यान न्यायासाठी यापुढे मेणबत्त्यांऐवजी कोयते हातात घेण्यासंबंधीचे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचाही आरोप करण्यात मुदलीयार यांनी केला आहे. या पोस्टमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मुदलीयार यांनी तक्रारीत म्हटले आहे. संबंधित पोस्ट सोशल मीडियावरून हटवून त्या दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
...............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.