मुंबई

विरोधानंतरही छटपूजेचा उत्साह

CD

विरोधानंतरही छठपूजेचा उत्साह
कडेकोट पोलिस बंदोबस्त; नवा पूल बंद राहिल्याने वाहतूक कोंडी

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : मनसे आणि उल्हास नदी बचाव समितीच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तसेच उल्हास नदीपात्रातील मातीच्या भरावावरून निर्माण झालेल्या वादानंतरही बदलापूरमध्ये शनिवारी (ता. १४) छठपूजा उत्साहात पार पडली. उल्हास नदीच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. संभाव्य तणाव लक्षात घेऊन नदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नदीपात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मनसे आणि पर्यावरणप्रेमींनी या भरावाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर छठपूजेच्या दिवशी नदी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
छठपूजेच्या आयोजनासाठी उल्हास नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नदीकडे जाणारा रस्ता आणि बदलापूर गावाला जोडणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. बदलापूर गावातून रेल्वे स्थानक परिसराकडे जाणाऱ्या तसेच स्थानक परिसरातून गावाकडे येणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलिस तैनात असतानाही भाविकांची मोठी गर्दी, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ आणि पुलावरील वाहतूक बंद असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT