बँकेत जमा केल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा!
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सीबीडी सेक्टर-११ येथील बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा जमा करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
येथील बँकेच्या बाहेरील बाजूस ग्राहकांसाठी एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीन आहे. मशीनमधील रोकड दररोज सकाळी ९ वाजता काढून तिचा हिशोब केला जातो. ३१ जानेवारीला नेहमीप्रमाणे रोकड तपासण्यात आली होती. १ फेब्रुवारीला रविवारची सुट्टी असल्याने २ फेब्रुवारीला सकाळी मशीन उघडण्यात आली. त्या वेळी बनावट नोटांसाठी असलेल्या स्वतंत्र कप्प्यात ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा आढळल्या. अन्य कप्प्यात १९ लाख रुपये योग्य स्वरूपात मिळाले. या नोटांबाबत बँकेच्या लोअर परेल येथील मुख्य करन्सी विभागाकडून माहिती घेण्यात आली. ३१ जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास तेलंगण, हैदराबाद येथील खातेदार वल्लभनेनी सुरेश बाबू यांच्या खात्यावर ९८ हजार ५०० आणि ९६ हजार ५०० रुपये जमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच खात्यावर सहा बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाला. मशीनने नोटा बनावट असल्याचे ओळखून त्या तत्काळ जप्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.