मुंबई

द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! अक्षर एस्टोनियातील ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च, तीन वर्षांत दीड कोटींचा भुर्दंड कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप

CD

द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो!
अक्षर एस्टोनियातील ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोडमधील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सेक्टर-४७ मधील अक्षर एस्टोनिया या गृहसंकुलातील ३५० हून अधिक कुटुंबांना गेल्या अनेक दिवसांपासून अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. सिडकोकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोसायटीला नाइलाजाने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी दरमहा तब्बल पाच लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.
द्रोणागिरीतील इतर अनेक गृहसंकुलांमध्ये अद्याप रहिवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने तेथे पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नाही, मात्र अक्षर एस्टोनियामध्ये ३५० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास असल्याने अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने सोसायटीच्या भूमिगत टाक्याही पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची तक्रार आहे. सिडकोकडून काही काळ सोसायटीला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र हे नियोजनही अपयशी ठरल्याने रहिवाशांचा त्रास कायम आहे. हेटवणे धरणातून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील तांत्रिक अडचणी आणि वारंवार होणाऱ्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, टँकरच्या पाण्याच्या वापरामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होत असल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली आहे

तीन वर्षांत दीड कोटींचा खर्च
आमच्या सोसायटीत ३५० कुटुंबे असून, सिडकोकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दरमहा सुमारे पाच लाख रुपये टँकरच्या पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. गेल्या तीन वर्षांत हा खर्च सुमारे दीड कोटींवर पोहोचला आहे. सिडकोकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष के. एन. भट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT