एफडीएचे अधिकारी असल्याचे भासवून लुटले
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : एफडीएचे अधिकारी असल्याचे भासवून चौघा जणांच्या टोळीने वाशीतील कोपरी गाव येथील किराणा दुकानदाराला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत या तोतया अधिकाऱ्यांनी दुकानदाराचे अपहरण करून मारहाण केली आणि त्याच्याकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात तब्बल दोन लाख ६६ हजार रुपये उकळले. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तोतयांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार अभिलाष पांडे हा कोपरी गावात राहण्यास असून त्याच ठिकाणी किराणा दुकान चालवतो. ४ नोव्हेंबर रोजी एफडीएचे अधिकारी असल्याचे भासवून चौकडी पांडे याच्या घरी गेले होते. त्यानंतर तो किराणा दुकानातून प्रतिबंधीत गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत आरोपी चौकडीने त्याच्या घराची झडती घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर आरोपीने पांडे याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले.
त्यानंतर आरोपींनी पांडे याला कोपरखैरणे आणि घणसोली परिसरात फिरवत मारहाण केली. तसेच गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करून त्याला गुह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि पैसे घेऊन पलायन केले. या घटनेमुळे घाबरलेल्या पांडे कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र, संबंधित व्यक्ती एफडीएचे अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पांडेने १३ नोव्हेंबर रोजी एपीएमसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.