घनसोलीत चायनीज उशिरा मिळाल्यावरून राडा
ऑर्डर लवकर मागितल्याने ग्राहकाचे डोके फोडले
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : रस्त्यावरील चायनीज गाडीवर जेवणाची ऑर्डर लवकर देण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चायनीज चालकाने व त्याच्या साथीदारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केल्याची घटना घणसोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मुख्य चालकासह त्याच्या साथीदारांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये हर्षद गुंजाळ व त्याचा मित्र अभिजित जाधव हे दोघे जखमी झाले आहेत. हर्षद आणि अभिजित हे शुक्रवारी (ता. १३) घणसोली येथील टेम्पटेशन चौकातील चायनीज गाडीवर जेवण करण्यासाठी गेले होते. हर्षद व त्याच्या मित्राने चायनीज चालकास आमची ऑर्डर लवकर करून द्या, अशी विनंती केली. यावर संतापलेल्या चायनीज चालकाने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि दर्शन चोरगे, चायनीज मसालावाला आणि इतर २ ते ३ साथीदारांनी हर्षद व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. मुख्य आरोपी दर्शन चोरगे याने त्याच्या हातातील मोठ्या चमच्याने अभिजितच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्यान तो गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर हर्षद आणि अभिजित या दोघांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.