जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट)
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलिटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पी.एम.सी. म्हणजे काय, आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ ऑगस्टला होणार आहे. यात इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रिडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ ऑगस्टला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवर उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील, जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात; मात्र योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याचसाठी याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २५ ऑगस्टला होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. घरमालक, रिअल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.