मुंबई

नाना पेठेत गोळीबारात तरुण ठार

CD

पुण्यात टोळीयुद्धाचा भडका
पुणे, ता. ५ : ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नानापेठेतील इमारतीच्या पार्किंगमध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला.
आयुष गणेश कोमकर (वय १९) असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी आयुषवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला; मात्र नेमक्या किती गोळ्या लागल्या, याची माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समजेल, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा दाखल झाला. घटनास्थळी जिवंत काडतूस आणि काही पुंगळ्या मिळाल्या आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली. गुन्हे शाखेची पथकेही रवाना करण्यात आली. या घटनेमुळे नानापेठेतील हमाल तालीम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून सुरू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणास वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीकडून बदला घेण्यासाठी तयारी केल्याची चर्चा सुरू होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज परिसरात रविवारी (ता. ३१) मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखला होता; परंतु पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याने कट उधळला गेला. या प्रकरणात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आयुषचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली.
............
वनराज आंदेकर खुनाचा बदला?
कौटुंबिक वाद आणि वर्चस्ववादातून गतवर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केला होता. या खूनप्रकरणी आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिरुद्ध दुधभाते, वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह १६ जणांना अटक केली होती. आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. याच प्रकरणाचा बदला म्हणून आयुषचा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT