मुंबई

ई-कॉमर्सद्वारे कृषी उत्पादनांची विक्री

CD

ई-कॉमर्सद्वारे कृषी उत्पादनांची विक्री
ई-कॉमर्सद्वारे कृषी उत्पादनांची विक्री यासंदर्भात मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्दिष्ट शेतकरी, एफपीओ आणि कृषी उद्योजकांना डिजिटल साधनांचे प्रशिक्षण देऊन, त्यांना कृषी उत्पादने ऑनलाइन विक्रीसाठी सक्षम करणे आणि सोशल मीडियाच्या मदतीने मजबूत बाजारपेठ निर्माण करणे आहे. कार्यशाळेत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची ओळख, ऑनलाइन कृषी स्टोअर सुरू करणे आणि डिजिटल पेमेंट प्रणाली समजून घेणे, सोशल मीडियाच्या मदतीने उत्पादनांचे प्रमोशन कसे करावे, ग्राहकांचे लक्ष कसे वेधावे, जाहिरातींचे नियोजन, ग्राहकांशी थेट संपर्क साधून विक्री वाढवण्याचे मार्ग, खते, बियाणे इत्यादी तसेच कृषी व अन्नप्रक्रिया उत्पादनांची विक्री आणि बाजार विस्तार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१

शिका मोडी लिपी
मोडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध लिपी आहे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. जुन्या काळातील अनेक शासकीय दस्तऐवज मोडी लिपीत असतात. या उद्देशाने ५ व ६ एप्रिल रोजी बेसिक व ॲडव्हान्स मोडी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोडी लिपीचा इतिहास, मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच प्रिंटेड व ई-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ही कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. मोडी लिपीमध्ये लिहिण्याची वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा यूडीसीपीआर नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलिटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ६ एप्रिल रोजी आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्द्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रिडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७


अन्न व्यवसायासाठी नियामक अनुपालन कार्यशाळा
अन्न व्यवसायासाठी नियामक अनुपालन या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा १२ व १३ एप्रिल रोजी आयोजिली आहे. यामध्ये अन्न उद्योगातील महत्त्वाच्या मानकांचे पालन कसे करावे, अन्न सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे, कायदेशीर पालन कसे करावे आणि संभाव्य दंड कसे टाळावे, याबद्दल आवश्यक माहिती दिली जाणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगातील व कृषी क्षेत्रातील व्यावसायिक, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, फूड स्टार्टअप सुरू केलेले नवउद्योजक, हॉटेल कंपनी व कॉलेज कँटीन मॅनेजर, सुपरवायझर, मालक, सप्लाय चेन मॅनेजमेंट व्यावसायिक, आयात-निर्यात क्षेत्रातले व्यापारी तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत FOSCOS पोर्टलचे विश्‍लेषण, अन्न व्यवसायातील अन्न सुरक्षा संस्कृतीचे महत्त्व, अन्न व्यवसायामधील महत्त्वाची प्रमाणपत्रे, लेखापरीक्षण व त्याचे महत्त्व, फूड क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, आयात-निर्यात व्यवसायासाठी महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, प्रमोशनल शासकीय एजन्सीज (अपेडा, एम्पेडा) आणि त्यांचे फायदे, अन्न व्यवसायातील महत्त्वाच्या केस स्टडीज आणि मार्गदर्शन आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT